*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनआपण ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकलोय त्या महाविद्यालयात जाताचं काही जुन्या आठवणी नेहमी जाग्या होत असतात. ती फक्त शाळा नसून कधी काळी आपलं एक कुटुंब होत, रोज त्या ठिकाणी आपण जीवनाची गणिते सोडवली आणि धडे घेतले, खूप सारा कधी ओळख नसणारा मित्रपरिवार जोडला, गुरुवर्यांच्या आशीर्वादाने आज सगळं ठीक आहे..
नेहमी शिक्षण घेत असताना एक प्रश्न असायचा पुढे जाऊन आपलं काय होईल, इथून शिक्षण घेऊन गेलेली पोर त्यावेळी पुढे नोकरीला लागली का काही तरी समाज उपयोगी उपक्रम, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत तेच पाहून कायम वाटायचं आपण पण असचं काही करावं, आणि हेच ध्येय ठेऊन पुढे शिक्षण घेत राहिलो, सतत काम करत होतो. पुढे हीच माझी आवड बनली आणि सामाजिक, राजकीय काम करण्यात आपल जीवन द्यावं अस ठरवलं.
त्यावेळी घेतले संस्कार आज जीवनात उपयोगी येतात. आपल्या पेक्षा मोठ्या लोकांचा आदर करा, नेहमी माणसं जोडण्याचे काम करा, आणि ज्या शाळेत शिकलो, ज्या समाजात, देशात राहतो त्यासाठी काही तरी देणं लागतो, म्हणून खूप दिवसांपासून वाटायचं काही तरी करावं पण सुरुवात कशी करावी असा प्रश्न होता. पण जेजे काही मनात होते ते बाजूला ठेऊन. जे होईल ते होईल असा विचार केला लोकांचं काही मनावर न घेता, मी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं त्या महाविद्यालयातील 2 होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय कपडे दरवर्षी देण्याचा निर्णय घेतला.
शिंदे सरणांना सांगितले सरांनी दोन विद्यार्थी निवडले आज त्या आदिवासी बांधव विद्यार्थ्यांना माझ्या व आमच्या ग्रामस्थांच्या हातून ते ड्रेस देण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. मला देखील खूप आनंद झाला कारण कधी काळी मी सुद्धा शर्ट एका रंगाचा तर पॅन्ट एका रंगाची वापरत असायचो ते दिवस माझे मला आठवले, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आज त्या परिस्थितीतून मी देखील पुढे आलोय याचा अभिमान वाटू लागला.
असो…
त्यावेळी समवेत मार्गदर्शक निर्मलग्राम कळस नगरीचे ग्रा.सदस्य, मा.भाऊसाहेब गाडगे. (पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष व कोरठण देवस्थान विश्वस्त.)
कार्यक्षम सरपंच राहुल दादा गाडगे, ऍड.सूर्यकांत काणे साहेब,मा.चेरमन शिवाजी गलांडे, संपूर्ण व्यासपीठ, समस्त ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक
आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व इतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते…!!
खर धन्यवाद या क्षणाचा फोटो काढणारा विद्यार्थी अनिकेत गुंजाळ.!!🙏
शिक्षा जीवन के लिए-जीवन वतन के लिए.
- युवामित्र गणेश विलास पाडेकर


