पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असेकी पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील नामांकित श्री दत्तकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या मुख्य कार्यालय इमारतीची वास्तुशांती सत्यनारायण महापूजा व उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी होणारा असून त्याचे उद्घाटन माननीय विशाल जी दाते उपनिबंधक पारनेर यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष गीतांजली ताई उदय शेळके तसेच अनिल जी वाढवणे साहेब मा पोलीस निरीक्षक मुंबई पिंपरी जलसेन सरपंच माननीय सुरेश जी काळे साहेब मानारायण थोरात साहेब चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी पिंपरी जलसेन सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत कार्यक्रम होणार असून यामध्ये समाज प्रबोधन भारुड सम्राट हरिभक्त परायण गोविंद महाराज गायकवाड यांचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व सभासद ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांना संस्थेचे चेअरमन व्हाईट चेअरमन व मॅनेजर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे संस्थापक चेअरमन व माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य माननीय लहुजी थोरात यांनी पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहे
