वास्तुपूजेच्या निमित्ताने गुलाबराव करंजुले पाटील यांचा डेझी गार्डन फेज-२ मधील रहिवाशांशी आपुलकीचा संवाद
पारनेरकर मित्रमंडळातर्फे सत्कार; अहिल्यानगर व कोकण विभागातील रहिवाशांची मोठी उपस्थिती
शिवांश उनवणे / अंबरनाथ
अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा अंबरनाथ शहराचे प्रथम नगराध्यक्ष आणि उद्योजक गुलाबराव करंजुले पाटील तसेच नगरसेवक अभिजीत करंजुले पाटील यांनी डेझी गार्डन फेज-२, बिल्डिंग क्रमांक २ येथे आयोजित सत्यनारायण पूजेनिमित्त सदिच्छा भेट देत रहिवाशांना शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यासह कोकण विभागातील रहिवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत सामाजिक आणि आपुलकीच्या नात्याला उजाळा दिला. यावेळी पारनेरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल उनवणे तसेच डेझी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष आशिष गावडे, सचिव सचिन गुरव आणि खजिनदार आशिष गोहिल यांच्या हस्ते गुलाबराव करंजुले पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीतील रहिवासी, पारनेरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बोलताना गुलाबराव करंजुले पाटील म्हणाले की, “या सोसायटीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश नागरिक वास्तव्यास आहेत. या परिसराच्या विकासासाठी कोणतेही काम घेऊन या; ते मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.” नागरिकांच्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.नगरसेवक अभिजीत करंजुले पाटील यांनीही परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करून परिसरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तुपूजेच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तेजस धुरी, निखिल परब, मोहन कांबळे, मिलिंद कांबळे, कमलाकर परब, विजय विश्वकर्मा, अक्षय उर्मुडे, प्राजक्ता उनवणे, कोमल उर्मुडे, शुभांगी काळे, लिला गोहिल, जयश्री शिरसाठ, तृप्ती परब, शितल धुरी, प्रियांका निकम, प्रिया जाधव, विभूती कांबळे, मंदा उनवणे आदींसह सोसायटीचे सदस्य व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “या सोसायटीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश नागरिक वास्तव्यास आहेत.
परिसराच्या विकासासाठी कोणतेही काम घेऊन या; ते मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.” तसेच“या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.
● अभिजीत करंजुले पाटील नगरसेवक
चौकट –
अंबरनाथ शहराच्या विकासासाठी अंबरनाथ शहराचे प्रथम नगराध्यक्ष तसेच शहराचे सर्वेसर्वा गुलाबराव करंजुले साहेब यांनी गेली चाळीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. या भागात वास्तव्य करणारे, उद्योजक व्यवसायीक व नोकरी निमित्ताने काम करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देण्याचे काम नेते गुलाबराव करंजुले व त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. एक विकासाचे महामेरु म्हणून करंजुले साहेब यांचा नावलौकिक असून त्यांचे चिरंजीव अभिजीत करंजुले व सुनबाई शहराच्या नगराध्यक्षा
तेजश्री विश्वजीत करंजुले या विकासाच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक वाढवीत आहेत.
दत्ताजी उनवने
( कार्याध्यक्ष पारनेर तालुका पत्रकार संघ )
फोटो ओळ
पारनेरकर मित्रमंडळातर्फे व अहिल्यानगर व कोकण विभागातील रहिवाशांची यांच्या वतीने गुलाबराव करंजुले पाटील तसेच अभिजीत करंजुले पाटील यांचा सत्कार करताना पारनेरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल उनवने व उपस्थित मान्यवर.


