ज्येष्ठ पत्रकार डॉ मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की श्री मळगंगा पर्यटन क्षेत्र कुंड येथे चोरट्यांनी चोरी केली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही अद्याप चोरीचा तपास न लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे चोरीचा तपास त्वरित न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री मळगंगा यात्रा कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव लंके तसेच सरपंच सौ चित्राताई सचिन पाटील वराळ यांनी नुकतेच निवेदनाद्वारे पोलीस उपनिरीक्षक श्री कोळपे साहेब तसेच पोलीस अमलदार प्रशांत दिनकर प्रकाश बोबडे हे निवेदन श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष श्री ज्ञानदेव नामदेव लंके साहेब यांच्या हस्ते देण्यात आले माता मळगंगा देवीच्या चोरीचा हा दुसरा प्रकार असून पहिल्या प्रकारामध्ये पोलीस यंत्रणेने त्वरित तपास लावल्याबद्दल त्यांचा सत्कार ही करण्यात आला होता याचप्रमाणे याही प्रकरणात त्वरित कार्यवाही होऊन चोरांना पकडण्याचा पोलीस यंत्रणेला यश द्यावे अशी भावना ग्रामस्थातून व्यक्त करण्यात आली या निवेदन प्रसंगी संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सचिन पाटील वराळ राळेगण थेरपाळ येथील सरपंच माननीय पंकज दादा कारखिले निघोज येथील उपसरपंच श्री ज्ञानदेव वरखडे साहेब माझी पोलीस पाटील पांडुरंग लंके साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव वराळ माता मळगंगा देवीचे पुजारी ठकाराम गायके विलास हारदे तसेच पारनेर तालुकापत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी लहुजी गागरे सदाशिव वराळ व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते



