गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा येथील गुरुकुल ज्ञानपीठ या विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक अत्यंत शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, त्यांना निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ही निवडणूक राबविण्यात आली होती.
ही निवडणूक प्रक्रिया शाळेचे संस्थापक श्री. कमल मदनलालजी माहेश्वरी व सौ. अर्चना माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणुकीसाठी एकूण तीन मतदान बूथ तयार करण्यात आले होते. प्रत्येक बूथवर पाच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. शाळेतील सर्व शिक्षकांनी निवडणूक कामकाजात सक्रिय सहभाग घेतला.निवडणुकीत अध्यक्षपदासाठी वंशिका अवताडे यांनी १८८ मते मिळवत विजय मिळविला. उपाध्यक्षपदी लक्ष जिंदे यांनी १०९ मते मिळवून बाजी मारली. सचिवपदासाठी लोकेश भाकरे यांनी १८१ मते मिळवून विजय संपादन केला, तर संयुक्त सचिवपदी प्रणव विखे यांनी १३७ मते मिळविली. कोषाध्यक्षपदी समर्थ राऊत यांची बिनविरोध निवड झाली.नवनिर्वाचित सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर देठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच शिस्तीच्या विकासासाठी जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.सदर निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चंद्रशेखर दातकर , शुभम राऊत ,जावेद शाह, गणेश धरमकर. निलेश चौडेकर .गंगा महाल्ले , किरणअहिर , अनुराधा राऊत. मधुरा राजनकर आरती घोगले .सिमा नळकांडे .पल्लवी टाले .यांनी विशेष सहकार्य केले. मतदान बूथची जबाबदारी रंजणी आखरे , अंकिता फोकमारे , पुजा घोगले , रेणुका उमाळे , शोभा जुंबडे , स्मिता राठी , पुजा लिलाडे, कविता सोळंके , प्रिती खक्कर, सरिता भोपळे , प्रिती खेडकर , कृष्णा शर्मा , प्रणाली नागळे , वर्षा तेल्हारकर, शारदा चोपडे मोहिनी सिंग यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया किशोर देठे सर व वर्षा पारस्कर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने ही निवडणूक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
