भाजप – शिवसेना युती कार्यकर्त्यांचा निघोज येथे जल्लोष.
पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोज कर
मुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच राज्यातील २९ पैकी २५ महानगरपालिका निवडणूकीत विजय मिळवील्याबद्दल निघोज येथे राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या मंदीरात मिठाईचे वाटप करीत तसेच मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करीत भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे यांनी राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची पुजा करुण अभिषेक केला. तसेच राजूकाका देशपांडे यांनी यावेळी पोराहित्य करीत पुजारर्चा केली. यावेळी
भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच तथा भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ वरखडे, भाजपचे सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे पाटील, ॲड . गणेश लाळगे, पारनेर तालुका भाजपचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर राऊत, जनसंघाचे तालुका प्रचारक भिमराव लामखडे, युवा नेते रविशेठ लंके, ग्रामपंचायत माजी सदस्या सुमनताई कवाद, भाजपचे बुथ प्रमुख योगेश ढवण, वसंत ढवण,
अल्पसंख्याक समाजाचे नेते प्रविण राऊत, वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष राजूकाका देशपांडे, गुलाब काळे, आपला गणपती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविशेठ रणसिंग, रावसाहेब वराळ, आकाश वराळ, दत्तात्रय लंके, शिवाजी भुकन, मच्छिंद्रशेठ लंके, गवराम तात्या लंके तसेच भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप शिवसेना विजयाच्या घोषना देत देवनभाऊ,शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है. नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विजयाच्या घोषना देण्यात आल्या. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यावेळी म्हणाले राज्यातील २९ पैकी २५ महानगरपालिका निवडणूक जिंकून भाजप – शिवसेनेची युती अभेद्य असल्याचे नेते व कार्यकर्ते यांनी दाखवून दिले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख कामांचा परिणाम मोठ्या प्रमाणात शहरात दिसून आल्याने गेली पंचवीस वर्षे ज्या उबाठाची सत्ता मुंबई महानगरपालीकेत होती त्यांना हद्दपार करण्याचे काम भाजप – शिवसेनेने केले आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले यावेळी म्हणाले राज्यात भाजप – शिवसेनेने चमत्कार केला आहे. तसेच अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूकीत राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पानीपत करुण पवार साहेब यांच्या पक्षाला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत भाजप – शिवसेना युती अशीच चमकदार कामगिरी करुण इतिहास निर्माण करील असा विश्वास कारखिले यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जो गरीबांच्या विकासाचा कार्यक्रम गेली दहा ते अकरा वर्षे सुरू ठेवला आहे. त्याची ही परिणती असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पक्ष मोठ्या प्रमाणात विजय संपादन करुन जिंकेल अशी खात्री व्यक्त केली आहे. भाजपचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर राऊत यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीणींना जो आर्थिक पाठबळ दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीबांच्या घरात ज्येष्ठ लोकांचा औषध व ईतर खर्चांना मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम चांगला झाला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भाजप व शिवसेना मोठ्या प्रमाणात विजयी होतील अशी खात्री व्यक्त केली आहे.
