*निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे प्रसिद्ध असलेल्या माता मळगंगेच्या दर्शनासाठी 26 जानेवारी च्या सुट्टी निमित्त पर्यटन शेत्र कुंड या ठिकाणी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे मातेच्या दर्शनाने व निसर्गरम्य अशा परिसरात भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत या ठिकाणी अनेक विकास कामे होत असून श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्ट मळगंगा माता भावी भक्त निघोज ग्रामस्थ मुंबईकर मंडळ अशा अनेक संघटनामुळे माता मळगंगेचे कुंड पर्यटन क्षेत्र तसेच गावातील मंदिरात अनेक विकास कामे होत आहेत यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर खासदार साहेब निलेशजी लंके विद्यमान आमदार साहेब माननीय काशिनाथ जी दाते सर व सर्व राजकीय लोकांच्या सहभागातून येथे विकास होत आहे या ठिकाणी येऊन आपण या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री मळगंगा ग्रामीण विकासाचे सचिव श्री शांताराम जी कळसकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे माता मळगंगेचे प्रसिद्धी प्रमुख श्री मुकुंद निघोज कर यांनी ही माहिती दिली