वांढेकर साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाश्री मुकुंद निघोज कर
प्रसिद्ध वास्तुविशारद वसंत वांढेकर साहेब यांचा वाढदिवस मंगळवार दि.२७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचा राळेभात कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी नंदाताई तसेच सुपुत्र हदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरव वांढेकर सर तसेच सुनबाई कावेरी व सर्व कुटुंब उपस्थित होते. पारनेर कारखाना ते निघोज हा वांढेकर साहेब यांचा कार्यकाळ जवळपास पस्तीस वर्षाचा, मात्र मळगंगा मातेच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या निघोज नगरीत वांढेकर कूटुंब स्थायीक झाले आणी ते निघोजचे एक वैभव ठरले.ही गाव व परिसरातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. गौरव सर यांनी निघोजचा नावलौकिक राज्यात केला. अतिशय शांत मनमिळाऊ स्वभावाचे हे कुटुंब आणी या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख वांढेकर साहेब यांनी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने गावकऱ्यांची मने जिंकली. वांढेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माता मळगंगा त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो तसेच सामाजिक सेवेसाठी माता मळगंगा देवीचा आशीर्वाद सातत्याने मिळो हीच मळगंगा मातेचरणी प्रार्थना 👏 शुभेच्छुक-नगर सह्याद्री परिवार, व्यापारी असोसिएशन निघोज, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, स्वरांजली केक्स निघोज, पारनेर तालुका पत्रकार संघ, पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज, आपला तालुका न्यूज चॅनल, अल्पसंख्याक समाज मंडळ
