१९ फेब्रुवारी
छत्रपती शिवराय जयंती
छत्रपती या शब्दात फार मोठी ताकद आहे. छत्रपती कुणाला म्हणावं तर ज्यांनी आपल्या प्रजेला छत्र दिलं, आश्रय दिला, सावली दिली. प्रजेसाठी जीव ओवाळून टाकला ते व्यक्तिमत्व म्हणजे केवळ छत्रपती शिवराय होते. खरोखर असा एकच राजा मिळाला या महाराष्ट्राच्या मातीला. ज्यांनी मावळा म्हणून शोधले साऱ्या अठरा पगड जातीला. महाराजांनी आपला राज्य कारभार हा सर्व अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालवला. महाराजांच्या स्वराज्याची ताकद फक्त तलवारीत नव्हती, तर ती होती माणसांमध्ये असलेल्या नात्यात, विश्वासात आणि निष्ठेत होती. मावळ्यांनी शिवरायांवर जीव ओवाळून टाकला कारण ते फक्त राजे नव्हते, ते आपल्या प्रत्येक सैनिकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व होते. मावळे रणांगणात छातीठोक लढले, कारण त्यांना ठाऊक होतं की, आपल्या पाठीशी उभा असलेला राजा आपल्यासाठी प्राण पणाला लावेल. जीव लावणं म्हणजे आंधळं समर्थन नव्हे, तर निष्ठा, विश्वास आणि समर्पण यांचा संगम होय हे मावळ्यांनी दाखवून दिलं, आणि माणूस कसा जपावा ते आपण महाराजांकडून शिकावं. त्यांनी कधीही जाती – धर्माचा भेद केला नाही. प्रत्येक निष्ठावंत माणूस त्यांच्यासाठी अमूल्य होता. स्वराज्य उभं राहतं ते मातीवर नाही, तर माणसांच्या मनावर हे महाराजांनी स्वतः कृतीतून सिद्ध केलं. आजच्या काळात आपणही हेच धडे लक्षात ठेवायला हवेत. नात्यांमध्ये निष्ठा असू द्या, मैत्रीत प्रामाणिकपणा असू द्या, आणि समाजात एकजूट असू द्या, कारण जीव लावणारे मावळे आणि माणूस जपणारे शिवराय असतील, तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही. आज माझ्या या राजाची जयंती.
माझे मार्गदर्शक,हितचिंतक मित्र व नातेवाईकांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…………!!
शुभेच्छूक : भूषण भरत बेल्हेकर ( देहुगाव )
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹
