दादाचा वादा – पूर्ण केला!”
*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून याबाबत सविस्तर वृत्त असे की ढवळे मळा येथे नुकताच काळभैरवनाथ मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना व कलशारोहण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला गेलो असता असे लक्षात आले की दादा कारखिले यांनी दिलेला शब्द ताबडतोब पाळला व मंदिरासाठी पिविंग ब्लॉक बसवण्याची मागणी पूर्ण केली निघोज गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्या आभार मानले विशेषता सचिन पाटील वराळ यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने त्याची पूर्तता झाली याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे कलशारोहण हरिभक्त परायण डॉक्टर जाधव यांनी केले ढवळे परिवाराने यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला व ग्रामस्थांनी सहकार्य केले
काल ढवळे मळा, निघोज येथील काळभैरवनाथ मूर्तीची स्थापना व कलशारोहण कार्यक्रमाला गेलो असता निघोज गावचे *उपसरपंच श्री माऊली शेठ वरखडे, राजुशेठ ढवळे, नाथाशेठ ढवळे* तसेच सर्व ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसवण्याची मागणी केली होती.
ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते सचिन पाटील वराळ यांच्या मार्गदर्शनाने राळेगण गावचे लोकनियुक्त सरपंच पंकज दादा कारखिले यांनी तत्काळ निर्णय घेत दुसऱ्याच दिवशी काळभैरवनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवून आपला शब्द पूर्ण केला.
दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणजेच गावाच्या प्रगतीची खरी ताकद! 🙏✨
