पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांचे कडून
*अळकुटी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील महान समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्रीसमानतेच्या क्रांतिकारी विचारवंत सावित्रीबाई फुले या केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांचे तेजस्वी प्रतीक होत्या. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते. अशा कठीण परिस्थितीतही सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. सावित्रीबाई फुले यांनी केवळ मुलींचे शिक्षणच नव्हे तर समाजातील शोषित, वंचित आणि दलित घटकांच्या उन्नतीसाठीही मोठे कार्य केले. विधवांसाठी आश्रय, बालहत्या प्रतिबंधक केंद्र आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात समानता, मानवता आणि शिक्षणाचे महत्त्व अधिक दृढ झाले. म्हणूनच सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या होय, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. कुंदा कवडे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.कवडे म्हणाल्या कि, सावित्रीबाई फुले यांचे जीवन आपल्याला संघर्ष, धैर्य आणि सेवाभावाची प्रेरणा देते. त्यांनी दाखवून दिले की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला पाहिजे, असे म्हटले.
याप्रसंगी प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. राजाराम गोरडे, सुनिता भालेराव, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.विशाल रोकडे तर आभार प्रा. पोपट सुंबरे यांनी केले.
