महिला दिन हा जगातील प्रत्येक मातेचा गौरवदिन – पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड
(अळकुटी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा)
जागतिक महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून महिलांच्या संघर्षांचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांसाठीची बांधिलकी दर्शवणारा दिवस आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सक्षमीकरण अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण ही आजच्या युगाची अत्यंत महत्त्वाची आणि अपरिहार्य गरज आहे. कोणत्याही देशाचा खरा विकास तेंव्हाच शक्य होतो, जेंव्हा समाजातील स्त्रिया शिक्षित, स्वावलंबी व आत्मनिर्भर होतात. महिलांनी कायद्याचा आधार घेऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे व महिलांच्या उन्नतीकरिता निर्माण केलेले कायदे जाणून घेतले पाहिजेत. महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. एकूणच महिला दिन हा जगातील प्रत्येक मातेचा गौरवदिनच आहे, असे प्रतिपादन सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सांस्कृतिक विभागाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. कुंदा कवडे यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक महिलेने आज समाजाभिमुख कार्य केले पाहिजे असे म्हटले. पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली व त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब डेरे उपस्थित होते. याप्रसंगी डेरे म्हणाले कि, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या जीवनाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार देणे. महिला सशक्त झाल्यास संपूर्ण समाज प्रगत होतो. कुटुंबातील संस्कार, शिक्षण आणि मूल्ये मजबूत होतात असे म्हटले. यावेळी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर म्हणाले कि, महिला या समाजाचा मूलाधार आहेत. महिला ही कुटुंबाचा व पर्यायाने देशाचा मूलभूत आधार असते. महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती असून या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे, असे म्हटले
याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे बहिशाल व्याख्याते ह.भ.प. संभाजी महाराज दरोडे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शिवले मॅडम, प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. राजाराम गोरडे, सुनिता भालेराव, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कुंदा कवडे यांनी केले, सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.विशाल रोकडे तर आभार प्रा. स्वाती फापाळे यांनी केले.

