*श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की एक मे 2026 पासून सुरू झालेल्या मळगंगा मातेच्या यात्रेचा कालचा महत्त्वपूर्ण असा दिवस दिनांक 11 एप्रिल रोजी शनिवार सकाळी घागर मिरवणूक साधारणता आठ ते साडेनऊ पर्यंत चालली हा महोत्सव अतिशय विलोभनीय असा होता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेला देवीचा भक्तगण या मिरवणुकीत सहभागी झाला गावातील श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्ट कार्याध्यक्ष व सर्व विश्वस्त सल्लागार तसेच निघोज ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सरपंच उपसरपंच तसेच सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ निघोज व यात्रा कमिटी अध्यक्ष व सर्व त्यांचे सहकारी मुंबईकर मंडळ अशा विविध संस्थांनी अतिशय चोखपणे भाविकांची सोय उपलब्ध करून दिली शासकीय अधिकारी वीज मंडळातील अधिकारी पोलीस प्रशासन यांनीही अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे रविवार दिनांक 12 रोजी कुंडावरील यात्रा संपन्न होणार असून भाविक भक्त कुंडावरील दर्शन घेऊन आपापल्या घरी कृपाप्रसाद घेऊन जात असतात देवीच्या कृपाशीर्वादाने भावी भक्त अतिशय सुजलाम सुफलाम असून लाखोच्या संख्येने भाविक भक्त देणगी स्वरूपात विकास कामासाठी दिली जाते अशा प्रकारे कुंडावर ही कुस्तीचा हंगामा तसेच तमाशा वगैरे कार्यक्रम आयोजित केले जातात गावातील मिरवणुकीप्रमाणेच कुंडावरही भावी भक्तांची सोय अतिशय योग्य केली जाते आलेल्या सर्व भाविक भक्तांचे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टमार्फत तसेच विविध संस्था मार्फत आभार व्यक्त करण्यात आले आहे अशाच प्रकारे आपण मळगंगा मातेचीदर्शन घेऊन अनेकांना या कृपाशीर्वादाचा लाभ द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे
