*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की दरवर्षी माता मळगंगेच्या यात्रेनंतर निघोज येथील तरुणांची मोठी फौज मळगंगा यात्रा कमिटी शिवबा संघटना निघोज सहकार महर्षी डी अँड डी फार्मसी कॉलेज व निघोज ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कुंड पर्यटन क्षेत्र येथे साफसफाई करण्यात येते हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय दरवर्षीच घेतला जातो यामध्ये तरुण दरवर्षी पंढरपूर यात्रेमध्ये सुद्धा साफसफाईसाठी जात असतात हा अनोखा असा कार्यक्रम तरुण वर्गाने हाती घेतलेला असतो यामध्ये जास्तीत जास्त निरोधकांनी यावर्षी सहभागी होऊन कुंड पर्यटन क्षेत्र स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे बुधवार दिनांक 15 4 26 रोजी पहाटे साडेपाच वाजता या कामाला सुरुवात होणार आहे तरी सर्व तरुण संघटनातील पदाधिकारी सहकारी ग्रामस्थ यांनी या कामे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

