श्री. सद्गुरूनाथ अमृतराव आण्णा वाघमारे महाराज , 19 वा पुण्यतिथी कार्यक्रम .
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर या ठिकाणी साजरा होत आहे.
सर्व भक्त गण आणि समस्त शिष्य वर्ग यांना कळविण्यात येते की, सालाबाद प्रमाणे या ही वर्षी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर गायमुख अवसरी खुर्द येथे , वैशाख पौर्णिमा दि. 01/5/26 शुक्रवार रोजी पौर्णिमेचा कार्यक्रम व वैशाख वद्य प्रतिपदा दि. 02/5/26 शनिवार रोजी रात्री ठीक 7.45 वाजता गुलालाचा व फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व शिष्य गणांनी व भाविकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती .
कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे .
दि. 01/5/26 शुक्रवार सायंकाळी 5.30 ते 7.00 भजन
दि. 01/5/26 शुक्रवार सायंकाळी 7.00 ते 7.30 पालखी व आरती.
दि. 01/5/26 रात्री 8.15 ते 9.15 प्रसाद.
दि. 02/5/26 शनिवार सकाळी 8.30 ते 9. 30 रुद्राभिषेक
दि. 02/5/26 शनिवार सायंकाळी 5.30 ते रात्री 7.40 भजन
दि. 02/5/26 शनिवार रात्री 7.45 गुलाल व फुले अर्पण करणे.
दि. 02/5/26 शनिवार रात्री 8.00 ते 9.30 पुण्यतिथी महाप्रसाद
वरील प्रमाणे कार्यक्रम साजरे करण्यात येतील.
ता. क. : ज्या भाविक भक्तांना रुद्राभिषेकसाठी आपल्या इच्छे नुसार दूध, दही,साखर, मध, केशर ई. आणावे आणि वेळेवर हजर रहावे रुद्राभिषेक सकाळी 8.30 वाजता सुरू होईल याची नोंद घ्यावी .
पुण्यतिथी कार्यक्रमाचा महाप्रसाद श्री गणेश घोडके व परिवार यांच्या काढून होईल.
सर्व कार्यक्रम वेळेवर होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
… श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर सेवा मंडळ .

