रामदास पुजारी ‘ आत्मसन्मान गौरव पुरस्कार २०२६ ‘ ने सन्मानित…
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र यांच्याकडून
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त, समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी, आपला आठवा वर्धापनदिन साजरा करत असलेला संघर्षनायक मीडिया व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजातील अनेक मान्यवर व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
दिनांक ११/०४/२०२६ रोजी सोलापूरच्या डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त वनाधिकारी, कवी, लेखक रामदास पुजारी यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार- २०२६ देऊन गौरविण्यात आले. शाल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची पताका खांद्यावर घेऊन लढणाऱ्या, समाजाच्या विविध घटकांतील काही मान्यवरांना ‘ संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले. २७ मान्यवरांना ‘आत्मसन्मान गौरव पुरस्कार ‘, १८ समाजसेवकांना ‘आदर्श समाजभूषण पुरस्कार ‘ तर १० सरपंचांना ‘ आदर्श सरपंच पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले.
