……निधन वार्ता…. पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्या कडून
कै. गं. भा. रंभाबाई मार्तंड मुळे, यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षाच्या होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे नामजप, अखंडपणे चालू होते. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात पाठीमागे दिंडी क्रमांक 58 च्या निष्ठावान पाईक होत्या. वै. गुरुवर्य डॉ. सारंग महाराज, वै. गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले, यांच्या त्या अनुग्रहीत होत्या. डॉ. नारायण महाराज जाधव बाबा आळंदी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. सुरुवातीपासूनच दिंडीमध्ये सर्व वृद्ध माता भगिनींना सांभाळून घेऊन त्यांचे बरोबर उत्कृष्टपणे वारकऱ्यांसाठी चा प्रसाद तयार करण्याची सेवा त्या करीत होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने सुपेकर परिवार, मुळे परिवार, तसेच परिसरातील सर्व वारकऱ्यांवर दुःखाची छाया पसरली. त्यांचा अंत्यविधी पठारवाडी येथे सर्व महाराज मंडळी व भजनी मंडळाच्या आजी-माजी अध्यक्षासहित मोठा जनसमुदाया समवेत पार पडला. .त्यांच्या पाठीमागे मुली पुतणे भाऊ असा मोठा परिवार आहे. सौ. इंदुमती पोपट खोसे, संगीत विशारद सौ. मंदा दत्तात्रय लामखडे, यांच्या त्या मातोश्री होत्या. श्री. जनार्दन मुळे, रेवजी मुळे, भास्कर मुळे, यांच्या त्या चुलती होत्या. पसायदान धर्मदाय सेवाभावी संस्थेचे संस्थापक , निवृत्त प्राचार्य श्री. रामचंद्र सुपेकर तसेच प्रगतिशील शेतकरी श्री लक्ष्मण सुपेकर यांच्या त्या भगिनी होत्या.
