*अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत पाटील टेके यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
भिंगार मधील डॉ. भावना आणि डॉ. अरविंद शेळके सेवा प्रेरणा केंद्राचे शनिवारी लोकार्पण होत आहे. यावेळी भिंगार छावणी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, छावणी परिसरातील डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत गांधी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थानिक अध्यक्ष डॉक्टर सी. डी ल. मिश्रा, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. शैलजा निसळ आणि एचआयव्ही एड्स बाधितांसाठी गेली चार दशके कार्यरत डॉ. मार्सिया वॉरन , स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीचे संस्थापक प्रमोद मुळे, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते जनकशेठ अहुजा , भूलतज्ञ डॉ.शिरीष कुलकर्णी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. कविता करीर आणि अमेरिकेतील संगणक तज्ञ समीर शेळके या
शेळके दांपत्याच्या
दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांची वास्तू सेवाकार्यासाठी स्नेहालय संस्थेकडे सुपूर्द केली.
येथे संकटग्रस्त महिलांसाठी स्नेहाधार हेल्पलाइन, कुटुंब स्वास्थ्य आणि समुपदेशन केंद्र, किशोरवयीन मुला-मुलींसाठी करियर गायडन्स आणि समुपदेशन , अभ्यासिका, वैद्यकीय तपासणी आणि सेवा प्रशिक्षण शिबिरे असे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती स्नेहालयच्या अध्यक्ष जयाताई जोगदंड, डॉ. प्रीती भोंबे, गीता कौर यांनी दिली.
भिंगार छावणी ,नागरदेवळे, वडारवाडीसह , आलमगीर या गावांच्या पंचक्रोशीत डॉ. भावना आणि डॉ. अरविंद शेळके यांनी 5 दशके वैद्यकीय सेवा दिली. गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करताना रुग्णाकडून आर्थिक अपेक्षा ठेवल्या नाहीत. तसेच स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी, रोटरी क्लब, वैद्यकीय व्यावसायिकांची संघटना , अहमदनगर क्लब अशा संस्थांचे विश्वस्त आणि देणगीदार म्हणूनही शेळके दांपत्याची भूमिका समाजविकासात महत्त्वपूर्ण होती,असे स्नेहालयाच्या विश्वस्त
डॉ.स्वाती घुले,डॉ. अंशू मुळे, सपना असावा, अनघा बंदिस्टी यांनी नमूद केले.
शनिवार, दिनांक 2 मे रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. शेळके प्रेरणा केंद्र ,विजय लाईन रस्ता, भिंगार हायस्कूल समोर, पाथर्डी रस्ता, वडारवाडी , भिंगार येथे प्रकल्पाच्या लोकरपणाचा सोहळा संपन्न होणार आहे..
आपली विश्वासू
संगीता सानप
M.९०११०२०१७८
