*पारनेर तालुका प्रतिनिधी श्रीरामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
पारनेर : देवीभोयरे गावचे विद्यमान सरपंच अशोकराव मुळे यांना देवीभोयरे गावात केलेल्या पायाभूत सुविधांतर्गत अहिल्यानगर याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर एम. पी. बिर्ला समूहाने देखील आदर्श सरपंच पुरस्कार अशोकराव मुळे यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे आदर्श सरपंच अशोकराव मुळे यांच्यावर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात देवीभोयरे गावची मान उंचावली गेली. यामुळे अशोक मुळे यांचा मुंबईकर मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये आदर्श सरपंच अशोकराव मुळे यांचा सत्कार उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व अंबु भंडारी यांनी तर सरपंच विठ्ठल शेठ सरडे यांचा सत्कार मुंबई कर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
देवीभोयरे गावच्या सरपंच पदावर अशोकराव मुळे याच्या सारखे उच्च शिक्षित व्यक्तीमत्व विराजमान झाल्यामुळे देवीभोयरे गावचा पायाभूत सुविधा अंतर्गत जिल्हा पातळीवर सन्मान झाल्याचे गौरोदगार मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांनी काढले. यामध्ये गावात असलेली जिल्हा परिषदेची आदर्श शाळा, गावच्या वैभवात भर टाकणारे ऐतिहासिक अंबिकामाता प्रवेशद्वार, त्यावर असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला असलेलं गजराज शिल्प, गावात असणारी सुसज्ज स्मशानभूमी, गावांतर्गत झालेले रस्ते गावची वेगळी ओळख करून देतात.
यावेळी सुभाषराव बेलोटे, सरपंच जयवंत मुळे, अहिल्यानगर येथील उद्योजक अजित शेठ चंगेडिया, किशोर शेठ डागा, उद्योजक अंबु शेठ भंडारी, उद्योजक बाळासाहेब बेलोटे, रमेश महाराज खोडदे, उद्योजक सावकार शेठ नरोडे, भास्कर भाऊ बेलोटे, कचर निचित साहेब, नामदेव चौधरी, शंकरराव चौधरी साहेब, बाळासाहेब मुळे, कचरू बेलोटे, संतोष कालघुगे, राजु बेलोटे, अनिल बेलोटे, सुरेश वाढवणे, प्रकाश मोरे, बबन बेलोटे, सचिन बेलोटे, भालचंद्र सरोदे, दादाभाऊ बेलोटे, दादाभाऊ वाढवणे, संतोष थोरात, आप्पाजी बेलोटे, विलास बेलोटे, गणेश राव बेलोटे, मच्छिन्द्र बेलोटे, सखाराम
बेलोटे, वैभव बेलोटे, जगन्नाथ मगर, संतोष बेलोटे, पत्रकार विनोद साळवे, बाळासाहेब बेलोटे, उपसरपंच दत्तात्रय मुळे, याबरोबर मुंबईकर मंडळातील सर्व सदस्य, गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवा संस्थेचे संचालक मंगेश मुळे यांनी तर आभार बाळासाहेब बेलोटे यांनी मानले. सत्काराला उत्तर देताना अशोकराव मुळे यांनी देवीभोयरे गावच्या जडणघडणीत मुंबईकर मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. गावच्या विकासात मुबंईकर मंडळाचे असलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे गौरोदगार अशोकराव मुळे यांनी काढले.


