निरोगी जीवनाचे मूलमंत्र: योग
=======================रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी श्री मळगंगा न्यूज*
“योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे येईल,
जीवनात सुख आणि शांती.”
२१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आपल्या भारत देशात ही हा दिवस योग दिन म्हणून साजरा करतात. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये या ठिकाणी योग प्रशिक्षक योग प्रात्यक्षिक करून दाखवतात व सर्वांकडून योगासने करून घेतात. प्राचिन काळापासून योग आरोग्यासाठी लाभदायक आहे. योग हा व्यायामाचा प्रभावशाली प्रकार आहे. शारीरिक अवयव व मानसिक संतुलन योग्य ठेवण्याचे कार्य योग करते. शारीरिक विकार, व्याधीवर रामबाण औषध म्हणजे योग होय. आधुनिक युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. सतत धावपळ व धकाधकीचे जीवन जगत असताना मनाला शांती मिळत नाही. मनाला शांती, आनंद मिळणे फार महत्त्वाचे आहे. शरीर आणि मन हे महत्त्वाचे घटक. योग करताना शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा नियमित सराव केला जातो. शारीरिक व मानसिक व्याधी दूर करण्यासाठी योग करणे आवश्यक आहे. नियमित योग केल्याने बौद्धिक पातळी सुधारते.
“योगाचा नियमित सराव करा
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा.”
एकाग्रता, मन शांती, संयम, अनुशासन, स्वावलंबन इत्यादी फायदे योग केल्याने होतात. प्राचीन काळी ऋषीमुनी जंगलात, आश्रमात योग करायचे म्हणून ते शंभर वर्षे जगत होते. आज संकरित आहार, रासायनिक खते, विषारी किटक नाशके, पर्यावरण असंतुलन, प्रदुषण या विविध कारणांमुळे मानवाचे आयुष्य फार कमी झाले आहे. अनेक प्रकारचे विकार होऊ लागले आहेत. दवाखान्यात प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे. पोषक आहार मिळत नाही. अशुद्ध हवा, अशुद्ध पाणी, व्यायाम न करणे या सर्व कारणांमुळे माणूस आजाराच्या बळी गेला आहे. विविध प्रकारचे व्यसन, फळे, पालेभाज्याचा आहारात अभाव. नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर होत आहे. अचानक वातावरणात बदल झाला की जीवजंतूंचा हमला होतो. माणसं आजारी पडतात. जर आपले आयुर्मान वाढवायचे असेल तर योगासने करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आयुष्य मिळवायचे असेल तर योग करणे आवश्यक आहे. यामुळे ध्यान धारणेची सवय लागते. दुर्धर आजाराचे प्रमाण कमी होते. आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी दररोज वेळ दिला पाहिजे. योग केल्याने तणावमुक्त जीवन जगण्यास मिळते. योग केल्याने ह्दयाचे आजार, पोटाचे विकार होत नाहीत.
“योग असेल जेथे
आरोग्य वसेल तेथे.”
योगासने करणे ही सुदृढ आरोग्याची गुरू किल्ली आहे. २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. रामदेव बाबा हे योगाचे मुख्य प्रवर्तक व प्रेरणा आहेत. आनंदी जीवन जगण्याचा मूल मंत्र म्हणजे योग. प्रत्येकाने वेळेत वेळ काढून सकाळी १ तास व सायंकाळी १ तास योगासने नियमित करावे. रोगाचे माहेर घर म्हणजे पोट. योग केल्याने पोटातील विकार नाहीसे होतात श्वसन संस्था सुव्यवस्थित चालते. जो योग करेल तो निरोगी राहील.
“करा योग,रहा निरोग.”
प्राचीन धार्मिक ग्रंथ वेदामध्ये योग साधनेचा उल्लेख आहे. विविध प्रकारचे योगासने व्याधी नाहीसी करतात. पतंजली ऋषीने योग जीवनात अनमोल असल्याचे सांगितले आहे. भारत देशात योगगुरू रामदेव बाबांने लोकांना योगाचे महत्त्व सांगितले आहे. आपले आरोग्य हीच धन संपदा आहे. आरोग्य मजबूत, दणकट व निरोगी ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
रत्नाकर बाबुराव पाटील [पर्यवेक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली,ता.जि. धाराशिव


