*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज येथील शिवबा संघटना दरवर्षी मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असते त्यानुसार त्यांनी याही वर्षी शालेय मुलांना दत्तक घेतलेले आहे व मुला व मुलींना साहित्य वाटप करण्यात आले
शिवबा संघटनेचे युवा सहकारी स्व. सचिन बोरगे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या दोन मुली व दोन मुलांची शिक्षणाची जबाबदारी सामाजिक बांधिलकी जपत शिवबा संघटनेने स्वीकारली आहे. या उपक्रमांतर्गत त्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च संघटनेच्या वतीने उचलण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून आज शिवबा संघटना कार्यालयात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, शिरूर तालुका अध्यक्ष सोमनाथ भाकरे, आपला गणपती मंडळाचे अध्यक्ष रवीभाऊ रणसिंग, मच्छिंद्र लामखडे, दत्तामामा लंके, संतोष देशमुख, अविनाश लामखडे, स्वप्निल वरखडे, योगेश भाकरे, बाबाजी कळसकर, सतीश साळवे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देत समाजातील गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याची शिवबा संघटनेची परंपरा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
“शिक्षणाची साथ, उज्ज्वल भविष्याची वाट” या ध्येयाने शिवबा संघटना सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


