पारनेर येथे भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; प्रदेशाध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक यांची प्रमुख उपस्थिती
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
पारनेर येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात भाजपा युवा मोर्चाचा भव्य कार्यकर्ता मेळावा अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष *श्री. कृष्णराज दादा महाडिक* यांची मुख्य उपस्थिती लाभली होती. त्यांच्या उपस्थितीने तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.
युवाशक्ती हीच पक्षाची खरी ताकद: कृष्णराज महाडिक
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी हा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी ही युवा मोर्चाच्या खांद्यावर आहे." तरुणांनी संघटित होऊन समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
“यावेळी भावना व्यक्त करताना भाजप राज्य परिषद सदस्य श्री.विश्वनाथ दादा कोरडे यांनी सांगितले की, युवा मोर्चाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांमधून पारनेर तालुक्यातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कृष्णराज दादा आपण वैयक्तिक लक्ष घालावे.”
या मेळाव्यादरम्यान पारनेर तालुक्यातील चालू घडामोडी आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पारनेर भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप राज्य परिषद सदस्य श्री.विश्वनाथ दादा कोरडे, सरचिटणीस सुभाषराव दुधाडे, जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, मंडल अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन वायकर, मा.नगराध्यक्ष नितीनराव अडसूळ, नगरसेवक युवराज पठारे, दूध संघ अध्यक्ष दत्ता नाना पवार, युवा मोर्चा उपाध्यक्ष पंकज कारखिले, कल्याण थोरात, लहू भालेकर, सोनाली आंबेकर, अतुल माने, अर्जुनराव नवले,जयदीप सालके पाटील, संग्राम पावडे, कानिफनाथ ठुबे यांसह ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, युवा मोर्चाचे जिल्हा व तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि शेकडो तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह
आगामी काळातील संघटनात्मक निवडणुका आणि पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कृष्णराज दादा महाडिक यांच्या आक्रमक आणि अभ्यासू मार्गदर्शनामुळे पारनेरमधील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात तालुक्यात पक्षकार्य अधिक वेगाने वाढवण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.निलेश शेळके व श्री.राहुल नरड यांना युवा मोर्चा मंडल उपाध्यक्ष तर श्री.मंगेश खोसे यांना युवा मोर्चा मंडल चिटणीस पदाच्या नियुक्तीची पत्र देण्यात आली.


