सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्यातलोकप्रिय असलेलेदैनिक लोक परिवर्तन यांचा चौथा वर्धापन दिन पारितोषिक वितरण समारंभ एक ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यानगर येथे होत आहे या दैनिक लोक परिवर्तन दैनिका मार्फतविविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी मान्यवर व्यक्तीपारनेर तालुक्यातील आळकुटी येथील माननीय आदर्श सरपंच सौ कोमल ताई भंडारी यांना सामाजिक क्षेत्रातील समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच वारकरी संप्रदायातील व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल श्री रामदास नरड साहेब यांना अध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी भूषण गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच पारनेर येथील वैद्यकीय क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असे काम करत असलेल्या डिंबा प्रकल्पात कार्यरत असलेल्या डॉक्टर सौ सुवर्णाताई लोळगे यांना आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच निघोज येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे या चारही पुरस्कार मिळालेल्या सन्माननीय व व्यक्तींचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे या पुरस्कारासाठी आपणही उपस्थित राहावे असेआवाहन पुरस्कार कर्त्यांनी केलेअसून संपादक श्री आबासाहेब शिरसा ठसाहेब उपसंपादक माननीय पोपटराव सोनवणे साहेब कार्यकारी संचालक माननीय भारत भालेराव साहेब व समस्त दैनिक लोक परिवर्तन समूहाने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे





