पंढरपूरच्या वारीत आमदार काशिनाथ दाते सरांची पारनेर शहरातील दिंडीला सदिच्छा भेट*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर शहरातील पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंडीला आमदार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत घेतली सदिच्छा भेट
महर्षी पराशर ऋषी वारकरी सेवा मंडळ, पारनेर यांच्या आषाढी पायी वारी दिंडीला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी तालुक्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करत वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, बाळासाहेब लामखडे, विठ्ठलशेठ कवाद तसेच पंढरपूर वारीसाठी मार्गस्थ झालेले वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




