📢 जाहीर निमंत्रण 📢
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरोडे यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर येथे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्व. अजितदादा पवार जयंती सप्ताह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दि. २२ जुलै २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण, युवा चषक क्रिकेट स्पर्धा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, युवक, महिला भगिनी, लोकप्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांनी या सेवाभिमुख उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. समाजहिताची भावना जोपासत एकत्र येऊन सेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याची ही एक उत्तम संधी आहे.
स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजसेवेचा व विकासाचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमांना आपली उपस्थिती आणि सहकार्य मोलाचे ठरणार आहे. चला, मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा जयंती सप्ताह संस्मरणीय आणि यशस्वी करूया.
आपले स्नेहांकित,
आमदार काशिनाथ दाते सर जनसंपर्क कार्यालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पारनेर




