भारतीय नरहरी सेना प्रणित
सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य
सराफ सुवर्णकार समिती अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
📍 कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक – सातारा
दि. 23/07/2026 रोजी सातारा येथे सराफ सुवर्णंकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्यच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस समितीचे सर्व कोअर कमिटी सदस्य 100% उपस्थित राहिले.
बैठकीमध्ये समितीची संघटनात्मक बांधणी, भविष्यातील धोरणे, कायदेशीर लढाई अधिक सक्षम करण्यासाठीचे नियोजन तसेच पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांनी समितीची भूमिका, संघटनेची वाटचाल, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि संघटनेच्या गरिमेचे जतन करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
राज्य कार्याध्यक्ष शशिकांतजी दीक्षित यांनी समितीच्या आगामी रणनीतीचे मुद्देसूद विवेचन करून भविष्यातील कार्याचा स्पष्ट आराखडा मांडला.
संघटन अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सुशांतजी बाबर यांनी नियोजन, विस्तार आणि कार्यपद्धतीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
समितीची कायदेशीर लढाई अधिक भक्कम करण्यासाठी अॅड. किरणजी कावळे यांनी विविध कायदेशीर बाबींवर सखोल मार्गदर्शन करून पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
बैठकीत उपस्थित सर्व कोअर कमिटी सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करून प्रदेशाध्यक्षपदी उमेशशेठ बुऱ्हाडे यांची निवड केली आणि त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
तसेच, समितीच्या नावाचा व पदाचा गैरवापर करून समितीच्या विश्वासार्हतेला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. भविष्यात कोणत्याही पदाधिकाऱ्याने अशा प्रकारचे गैरवर्तन करू नये, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिला.
बैठकीच्या शेवटी गणेशजी टाक आणि गणेशजी बनछोड यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सदस्यांचे आभार मानले.
या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन राज्य उपाध्यक्ष सुजितशेठ जगताप, राज्य कार्याध्यक्ष शशिकांतजी दीक्षित तसेच सातारा शहर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडले.
एकजूट • पारदर्शकता • कायदेशीर लढा • संघटन हाच आपल्या समितीचा पाया!
जय महाराष्ट्र!
जय शिवराय!
जय संविधान!



