पारनेर भाजप कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे
भारतीय जनता पक्ष, पारनेर तालुका कार्यालयात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील थोर लोकशाहीर, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे *महामानव अण्णाभाऊ साठे* यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजप राज्य परिषद सदस्य मा.श्री.विश्वनाथ दादा कोरडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष किरणभाऊ उमाप, तालुकाध्यक्ष कृष्णा उमाप, सचिव विकास साळवे, मोहन साळवे, भाजप उपाध्यक्ष अर्जुन नवले, युवा मोर्चा चिटणीस मंगेश खोसे, खरेदी–विक्री संचालक प्रमोद कावरे, युवराज अवचार, राणीताई उमाप, राहुल साळवे, राजेंद्र अवचार, गणेश साळवे, मोहन साळवे, भाऊसाहेब उमाप, देवेंद्र आल्हाट, देवदत्त साळवे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी आणि साहित्यातून श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे आणि उपेक्षितांचे जीवन वास्तववादी पद्धतीने मांडले.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि त्यांनी दिलेली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” – मा.श्री.विश्वनाथ दादा कोरडे (सदस्य, राज्य परिषद भाजपा महाराष्ट्र राज्य)




