ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की बाबासाहेब कवादनागरी सहकारी पतसंस्था निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 26 रोजी संस्थेचे चेअरमन माननीय वसंतरावजी बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन श्री सोपानरावजी भाकरे साहेब तसेच महानगर बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय भास्कर बाबासाहेब कवाद तसेच असंख्य सभासद बांधवव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. पुष्कर लॉन्स निघोज शिरूर रोड या ठिकाणी सभा संपन्न झाली सर्व ठरावांना एक मुखाने सभासदांनी मंजुरी दिली या सभेमध्ये युवा कार्यकर्ते रुपेश ढवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे श्री सोमनाथ जी वरखडे साहेब व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बबन तनपुरे शिवबा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे कार्यकर्ते अनिलजी शेटे तसेच पत्रकार कवाद इत्यादींनी आपले विचार मांडले व काही सूचना मांडल्या संस्थेचे सभासद व पत्रकार मुकुंद निघोजकर यांनीही व्याजदराबाबत सूचना मांडली सर्व सूचनांचा विचार करून योग्य ते निर्णय केला जाईल असे अध्यक्ष भाषणात वसंत कवादयांनी सांगितले एडवोकेट बाळासाहेब लामखडे संचालक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली


