निघोजला नागपंचमीनिमित्त कलगीतुरा कार्यक्रमाची १०० वर्षाची परंपरा —*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज करयांच्याकडून
निघोज मळगंगा यात्रा उत्सव कमिटीने ग्रामपंचायत पढवीमध्ये नागपंचमीनिमित्त आयोजित केलेल्या नियोजन मिटींगमध्ये कलगीवाले म्हणुन ठकसेन शिंदे गुळंचवाडी बेल्हे व तुरेवाले म्हणुन लहुदादा कदम ताजु , कर्जत यांना निमंत्रित करण्याचे ठरले आहे.
नागपंचमी निमित्त कलगीतुरा कार्यक्रमाला निघोजमध्ये १०० वर्षाची परंपरा असल्याचे उपस्थितांनी सांगितले.४५ वर्षापासुन या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाहीर मुरलीधर सुपेकर हे करतात.कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन शाहीर संघटनेकडून करण्यात आले.
यावेळी मा.सभापती खंडुजी भुकन , बाळासाहेब लामखडे, ज्ञानदेव लंके, नानापाटील लंके, रामदास लंके,दौलत भाकरे ,देवरामबुवा लामखडे, रामचंद्र महाराज सुपेकर,अँड . गणेश लाळगे, मेजर विकास वराळ, अशोक ढवळे,गवराम लंके, बजरंग वराळ , प्रभाकर लंके आदींनी आपल्या सुचना मांडल्या.
मळगंगा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके, उपाध्यक्ष अर्जुन लामखडे, सचिव ज्ञानेश्वर वरखडे, खजिनदार दिलीप ढवण यांनी सर्वांच्या सुचना ऐकुन घेतल्या.
निघोजसह परिसरातील विविध गावातुन आलेल्या कलाप्रेमींना बसण्याची आसन व्यवस्था व जागेवर दुपारी बारा वाजता नाष्टा व पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन यावेळी ठरविण्यात आहे.
यावेळी उपस्थित प्रगतीशील शेतकरी दौलतराव पांढरकर यांना आर्दश शेतकरी पुरस्कार मिळालाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सभापती खंडुजी भुकन यांनी तर उपस्थित आभार सर्वांचे आभार अध्यक्ष शिवाजीराव लंके यांनी मानले.



