दत्ताजी गाडगे व मुकुंदराव निघोजकर यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न 🌹🌹*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी दत्ताजी गाडगे यांची नियुक्ती तसेच ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव निघोजकर यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचा सत्कार आज सायंकाळी ७ वाजता मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट* कार्यालयातील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी या दोन्ही मान्यवरांचा सत्कार सोहळा पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, माजी उपाध्यक्ष संतोषशेठ ईधाटे, पत्रकार योगेश खाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र महाराज सुपेकर सर, पत्रकार सागर आतकर, पत्रकार भगवान श्रीमंदीलकर, पत्रकार सचिन जाधव, पत्रकार संपतराव वैरागर, पत्रकार दत्तात्रय लंके, पत्रकार रोहन उनवणे तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे साहेब यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी २४ पत्रकार मित्रांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र कामाच्या निमित्ताने ते बाहेरगावी असल्याने येऊ शकले नाही. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकार मित्र उपस्थित राहीले त्याबद्दल राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ, पारनेर तालुका पत्रकार संघ व पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज यांच्या वतीने धन्यवाद व हार्दिक आभार तसेच सत्कार मुर्तींनी आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद व हार्दिक आभार 👏👏
तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद सर, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर तसेच सर्व पदाधिकारी व विश्वस्त मंडळ तसेच व्यवस्थापक महेश ढवळे साहेब यांनी पत्रकार संघाच्या या सत्कार सोहळ्यास सभागृह उपलब्ध करून दिले त्याबद्दल धन्यवाद व हार्दिक आभार 👏👏👏👏👏 पत्रकार मित्रांचे संघटन महत्वपूर्ण आहे. कोण कोणत्या पदावर जातो त्यापेक्षा त्या पदाधिकाऱ्याला किती पत्रकारांचे पाठबळ मिळत आहे. तसेच तो पदाधिकारी किती पत्रकार मित्रांना संघटीत करु शकतो यावर त्या पदाला किंमत असून आज मी अंबरनाथ या ठिकाणी असताना सुद्धा निघोज येथील पत्रकार मित्रांनी एकत्र येऊन हम भी कुछ कम नही हेच दाखवून दिले आहे. सर्व पत्रकार मित्रांना धन्यवाद व हार्दिक आभार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



