खरोसा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा ,,
ह.भ.प भुषण महाराज तळणीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन काल्याचे किर्तन संपन्न
प्रतिनिधी जीवन जाधव यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकतेच
,..औसा तालुक्यातील खरोसा येथे गेल्या ५३ वर्षापासुन अविरतपणे दरवर्षी श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा निमीत्त खरोसा येथील सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजीत केला जातो ,
खरोसा येथील अखंड हरिनाम सप्ताहात दैनंदिन काकडा.गाथा भजन ,सावता चरिञ ,ज्ञानेश्वरी पारायण ,सह नामवंत ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर सह किर्तनकारांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते , आज श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मीनी यांची विधीवत पुजा करुन संगीतमय वातावरणात शेकडो भाविकांनी काल्याच्या किर्तनाचा आनंद घेतला ,
गेल्या 53 वर्षापासून भक्ती भावाने श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी खरोसा ग्रामस्थ साजरी करतात पुण्यतिथी साजरी करत असताना सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सात दिवस गावात प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची गर्दी होते व भाविक या सप्ताहाचा मनसोक्त आनंद आनंद घेतात. ऐन आषाढी मध्ये येणाऱ्या या सप्ताहाला दरवर्षी पावसाची हजेरी असते व शेतकरी भाविक भक्त भर पावसात हा सप्ताह साजरा करतात पण यावर्षी पाऊस मनासारखा पडत नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून संत सावता महाराज चरणी नतमस्तक होऊन खरोसे करांनी भरभरून पाऊस होऊ दे व बळीराजा सुखी असुदे असं साकडं घातले यावेळी
यावेळी सप्ताह कमीटी मार्गदर्शक सदस्य व्यंकटराव राउतराव ,सह ,समस्थ भजनी मंडळ व खरोसा ग्रामस्थ उपस्थीत होते ,


