निघोज–कुंड रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी द्या; ग्रामस्थांचे आमदार दाते सरांना निवेदन
*ज्येष्ठ पत्रकार व कार्यकारी संपादक लोक परिवर्तन डॉ मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
निघोज ते कुंड या अंदाजे ३.५ कि.मी. रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करून कामास तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी निघोज ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायत व मळगंगा ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निघोजची लोकसंख्या सुमारे २० हजार असून कुंड येथे प्रसिद्ध मळगंगा माता मंदिर व जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. मात्र, निघोज–कुंड रस्ता खराब झाल्याने नागरिक व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यास वाहतूक सुलभ होऊन पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
निवेदनावर प्रभाकर नारायण कवाद, ज्ञानदेव नामदेव लंके, भाऊसाहेब विठोबा लामखडे, वसंत काशिनाथ ढवण, रोहिदास सावकार लामखडे, सोमनाथ दौलत वरखडे व रमेश भाऊ वरखडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


