💐देशासाठी झटणारा खरा देशभक्त डॉ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार💐
💐कुंभार समाजाच्या या महान नेत्यास जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐
*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री भगवान आनंदा श्री मंदिरकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की
डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म 15/09/1909 वर्षी झाला, स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.
*अशा महान नेत्यास कुंभार समाज सामाजिक संस्था व जळगाव जिल्हा कुंभार समाजा तर्फे विनम्र अभिवादन*
💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹💐



