*पारनेर तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व निघोज गाव मधील पत्रकार बांधव यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार माननीय दत्ताजी उनवणे व पसायदान संस्थेचे अध्यक्ष माननीय सुपेकर सर यांनी सदिच्छा भेट दिली
*माजी सरपंच तथा निघोज परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत लामखडे*
माजी सरपंच व निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन तसेच शिखर पाणी वापर संस्थेचे मुख्य पदाधिकारी संचालक चंद्रकांत लामखडे यांची सदिच्छा भेट त्यांच्या फॉर्महाऊसवर घेण्याचा योग आला. समवेत ज्येष्ठ मार्गदर्शक तथा पठारवाडी येथील पसायदान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र महाराज सुपेकर सर होते. यावेळी कुकडीचे पाणी व निघोज परिसर ही चर्चा केली व लामखडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. नगर सह्याद्री सारिपाटचे त्यांनी भरभरून कौतुक केले. मी कायमस्वरूपी सारिपाट वाचनारा वाचक आहे. नगर सह्याद्री हे एक लोकाभिमुख वृत्तपत्र असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचे काम नगर सह्याद्री परिवार माध्यमातून होत असून डिभा – माणिकडोह बोगद्याच्या भुमिकेवर नगर सह्याद्री वृत्तपत्राने ठाम भूमिका घेतली आहे. हे काम पुर्ण झाल्यास नगर जिल्ह्यातील दक्षिण भागाचे खऱ्या अर्थाने नंदनवन होईल हा दुष्काळी भाग म्हणून कायमचा डाग पुसला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. निघोज आणी परिसरातील विकासकामांसाठी लामखडे साहेब यांचे योगदान सर्वाधिक असून सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर वै.गुलाबराव शेळके साहेब व निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वै. बाबासाहेब कवाद यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी कुकडीचे पाणी व पाणी वापर संस्था याबाबत दक्ष भुमिका घेत शिवशक्ती पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून तसेच निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना पाठबळ देत या परिसरात शेतीच्या माध्यमातून समृद्धी निर्माण होण्यासाठी लामखडे साहेब व त्यांचे सहकारी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे व्हा.चेअरमन व नामांकित अशा मळगंगा कंट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष तथा फलोद्यान संस्थेचे ज्येष्ठ संचालक व व्यापारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष रामदासशेठ वरखडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विकासाभिमुख निघोज परिसर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. लामखडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर सुपेकर सर व मला चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद व हार्दिक आभार.
शुभेच्छुक- नगर सह्याद्री परिवार, पत्रकार संघ



