पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री भगवान श्री मंदिर कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की मूळचे जारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील रहिवाशी वैकुंठ वाशी लक्ष्मण हरिभाऊ ढोबळे यांचे दिनांक 17 सप्टेंबर 2026 गुरुवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंडळा तीलमाजी अध्यक्ष श्री नथुराम ढोबळे यांच्या सहवासाने या परिवारात आलेले अध्यात्मिक क्षेत्रात निपुण असणारे वैकुंठवासी लक्ष्मण हरिभाऊ ढोबळे यांनी 1979 सालापासून मंडळामध्ये सद्गुरूंच्या सेवेत आपले आयुष्य खर्ची घातले जेमतेम परिस्थिती असलेले व काबाडकष्ट करणारे वैकुंठवासी लक्ष्मण हरिभाऊ ढोबळे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी निमगाव Dudeतालुका शिरूर जिल्हा पुणे येथे वास्तव्यात आले त्यांनी अतिशय काबाडकष्ट करून मुलांना उच्च असे शिक्षण दिले अध्यात्मिक संस्कार घडवले त्यांनी सातत्याने गायमुख येथील श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिरात पौर्णिमा उत्सवात व इतर सर्व उत्सवात हिरीरीने भाग घेतला त्यांचे अध्यात्मिक कार्य खूप मोठे होते त्यांना भेदिक गाण्याचा खूप छंद होता तसेच अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी अतिशय उंची गाठली होती सद्गुरु सेवेत त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले मुलांना चांगले संस्कार दिले आहेत काही काळ त्यांनी आपल्या हॉटेल व्यवसायानिमित्ताने निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथेही श्री मळगंगा मातेच्या सेवेत आपला काळ व्यतीत केला असे स्वर्गीय लक्ष्मणराव हरिभाऊ ढोबळे वय वर्ष 65 यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी निमगाव दुडेयेथे होणार आहे त्यांच्या जाण्याने श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंडळ अवसरी खुर्द येथे शोक व्यक्त करण्यात आला त्यांच्या जाण्याने अध्यात्मिक कार्यात मोठी उणीव भासणार आहे असे वक्तव्य अध्यक्ष माननीय सोनटक्के यांनी केले तसेच प्रभाकर स्वामी टेंबे महाराज यांचे कार्य व मार्गदर्शक श्रीयुत थोरात सर सोलापूर तसेच मंडळातील सर्व सभासद व प्रभाकर स्वामी टेंबे महाराज भक्त उपस्थित होते



