‘हुंदका एका आईचा’ : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा निर्मित एक हृदयस्पर्शी कथानक असलेला लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या सेवेसाठी हजर होत आहे
*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
शिरूर : मातृत्वाची ओढ, कौ टुंबिक नात्यांमधील संघर्ष आणि एका कथेतील नायिकेच्या आयुष्यातील भावनिक चढ-उतार यांवर भाष्य करणारा ‘हुंदका एका आईचा’ हा लघुचित्रपट तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून लवकरच सादर करण्यात येणार आहे. या लघुचित्रपटा चे निर्माते रामदास राऊत यांनी सांगितले
ग्रामीण भागातील एका महिलेच्या मातृत्वाच्या मायेने विचारलेल्या पछाडलेल्या नायकीच्या इच्छेभोवती या कथानकाची गुंफण करण्यात आली आहे. आई होण्याची तीव्र इच्छा असलेल्या या नाईकीला आयुष्यात वैवाहिक जीवन व परिस्थिती, वैद्यकीय अडचणी, कशाप्रकारे निर्माण होतात पुढे पतीचे निधन, पुनर्विवाह आणि त्यानंतर निर्माण झालेला पेच प्रसंग यातून होणाऱ्या कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक भावनिक प्रसंग निर्माण होतात.
कथानकातील नायिकेला आयुष्यात वारंवार प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. पहिल्या पतीच्या निधनानंतर सासू-सासरे तिच्या भवितव्याचा विचार करून पुनर्विवाहाचा आग्रह धरतात. त्यानंतर नव्या कुटुंबातही तिला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अखेरीस निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तिच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष आणि मातृत्वाची अपूर्ण राहिलेली आस कथानकाला वेगळी दिशा देते.
ग्रामीण कलाकारांना प्राधान्य
‘हुंदका एका आईचा’ या लघुचित्रपटाच्या माध्यमातून नवोदित तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देण्याचा मानस निर्माते रामदास राऊत यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक कलाकारांना आपल्या अभिनयाची क्षमता दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.
मातृत्व, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनिक संघर्ष या विषयांना स्पर्श करणारे कथानक असल्याने ‘हुंदका एका आईचा’ हा लघुचित्रपट प्रेक्षकांसमोर आल्यानंतर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित हा लघुचित्रपट थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची तयारी सुरू आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी विविध स्तरातून कलाकारांचे फोन येत असल्याचे निर्माते यांनी सांगितले परंतु ज्यांच्यामध्ये काम करण्याची कुवत आहे अशा कलाकारांना काम देण्याची जबाबदारी प्रोडक्शन ची राहील असे मत त्यांनी व्यक्त केले पुढील महिन्याच्या दहा ऑक्टोबर दरम्यान शूटिंग सुरू होईल असे निर्माते रामदासर राऊत त्यांनी सांगितले शूटिंग ठिकाण व मुक्काम पोस्ट वडनेर खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी लोकेशन असून तेथील आमचे सहकारी मित्र श्री नवनाथ जी राऊत सर यांचे निवासस्थानी व वडनेर परिसरात शूटिंग घेतली जाईल तसेच या कथांमध्ये नवनाथ जी राऊत सर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे निर्माते रामदास राऊत सर यांनी सांगितले हा चित्रपट नक्कीच ग्रामीण व शहरी भागातील प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटत असल्याचे रामदास राऊत यांनी सांगितले



