सविस्तर वृत्त असे की याही वर्षी श्री मळगंगा युवा साईधाम गणेश मित्र मंडळाने गणपतीतील दहा दिवसात अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम समाज प्रबोधन आधारित कार्यक्रम सादर केले या मंडळाचे यावर्षी 51 वे वर्षे असून सत्यनारायण महा पूजा निमित्त पारनेरचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ दिवटे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले यावेळी मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला अतिशय शिस्तबद्ध असे कार्यक्रम सादर केल्याबद्दल सदिच्छा दिल्या श्री सत्यनारायण महापूजेसाठी पारनेर तालुका पत्रकार संघाचे व लोकमत पत्रकार श्री भास्करराव कवाद यांना पूजेचा मान मिळाला या मंडळाचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून प्रेरणादायी आहे गावातील सर्व गणेश मंडळाच्या विसर्जनासाठी आलेल्या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष याचा सत्कार करून सलोखा निर्माण करतात अशाच प्रकारे कार्य त्यांच्यातून सतत घडावी अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार तथा लोक परिवर्तन दैनिकाचे कार्यकारी संपादक डॉ. मुकुंद निघोजकर यांनी व्यक्त केले आहे



