*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेली शिवबा संघटना यांनीही यावर्षी सालाबादप्रमाणे सन्मान कर्तव्यदक्ष जबाबदारीचा सन्मान वर्दीतल्या कर्तुत्वाचा या भावनेने शिरूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव यांचा सन्मान करून यशस्वीरित्या गणपती विसर्जन पार पाडल्याबद्दल काठी भेट देऊन सन्मान केला त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल आभार मानले त्यांचा सतत सामाजिक कार्यात उपक्रम चालूच असतो मागेही त्यांनी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले त्यांच्यासाठी दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत त्यांचे हे कार्य अखंड राहो असे जनतेतून म्हटले जात आहे निघोज मधील शिवबा संघटना दिवसेंदिवस सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत आहे त्यांना अशीच प्रेरणा ईश्वर देवो व त्यांच्या आतून जास्तीत जास्त सामाजिक कार्य घडो असे विचार डॉ. मुकुंद निघोजकर यांनी व्यक्त केले आहे



