मुर्ती लहान पण कीर्ती महान
=====================*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून
लालबहादूर शास्त्रीचा जन्म २ आक्टोबर १९०४ रोजी उत्तरप्रदेशातील वाराणसी शहराजवळील मुघलसराई गावात झाला. वडील प्राथमिक शिक्षक होते. अचानक वडीलांचा मृत्यू झाला. त्यावेळी शास्त्रीचे वय अवघे दिड वर्षाचे होते. आईचे वय अवघे वीस वर्षाचे व तीन आपत्य. शास्त्रीची आई मुलांना घेऊन माहेरी राहण्यासाठी गेली. शास्त्रीचे शिक्षण खेडे गावात आजोळीच झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना शास्त्रीचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च शिक्षण घेण्यासाठी शास्त्रीला वाराणसीला काकाकडे पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी पायाणे चालत जायचे. कडक उन्हाळा सुरू असताना ही बिना चपलाचे शाळेत जायचे. तारुण्यात शास्त्रीला इंग्रजांच्या गुलामगिरीची जाणिव झाली. परकीयांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी लढा सुरू झाला. लालबहादूर शास्त्रीने यात उडी घेतली. गांधीजीने स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती. गांधीजीच्या विचाराने प्रेरित होऊन शास्त्रीने लढ्यात सहभाग घेतला. शिक्षण सोडून देशसेवा करण्यासाठी पुढाकार घेतला. ब्रिटिश सरकारला सहकार्य करायचे नाही म्हणून *अहकार चळवळ* सुरू केली. शास्त्रीने शिक्षण सोडून दिले आई फार नाराज झाली. सन १९२६ ला काशी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठाने शास्त्री नावाची पदवी बहाल केली. लालबहादूरचे मूळचे आडनाव श्रीवास्तव होते. सन १९४२ साली भारत छोडो आंदोलन सुरू केले. जातिभेद, अस्पृश्यता देशाला लागलेला कलंक होता. जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सन १९५२ साली पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान असताना लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री झाले. सन १९५३ ला केरळ राज्यात रेल्वे अपघात झाला. १५० लोक मरण पावले. रेल्वे मंत्री पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारली व मंत्री पदाचा राजीनामा दिला. सन १९६४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. १९६५ साली पाकिस्तान ने भारता बरोबर युद्ध सुरू केले. तेव्हा कणखर भूमिका घेत ईट का जवाब पत्थर से देंगे
अशी ताठर भूमिका घेतली. धैर्याने सामना केला. जय जवान असी घोषणा केली व सैनिकांचे मनोबल वाढवले. युद्ध भारतीय सैन्यांनी जिंकले. पाकिस्तान चे मुख्य शहर लाहोर काबीज केले. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीने जगाच्या पोशिंदा बळीराजा चे महत्त्व देशाला पटवून दिले.
जय किसान
घोषणा करून शेतीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आव्हान केले. हरित क्रांती शिवाय देशाचा विकास असंभव आहे. सर्व भारतीय जनतेच्या मनात शास्त्रीने घर केले. सन १९६६ च्या ताश्कंद करारावर स्वाक्षरी करून काही तासांनंतर शास्त्रीचा मृत्यू झाला. महान मानवास मृत्यूनंतर भारत सरकारने भारत रत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खरोखरचं शास्त्री दिसायला उंचीने लहान होते पण जगात कीर्ती हिमालय पर्वतासारखी उंचीवर होती. म्हणून शास्त्रीला मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हटले जाते.
रत्नाकर बाबुराव पाटील
{पर्यवेक्षक]
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, शिंगोली ता. जि. धाराशिव
मो. ९४०३३९४८१८



