श्री संत शिरोमणी नरहरी महाराज ७४० वी पुण्यतिथी उत्सव
. सुपा शहर
सराफ संरक्षण समिती प्रसिद्धीप्रमुख अहिल्यानगर श्री मुकुंद निघोज कर यांचे कडूनआज सुपा शहरात सराफ सुवर्णकार समाज माता-बंधू-भगिनींनी प्रचंड उत्साहाने आणि चांगल्या संख्येने नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली.
▪️ दीपप्रज्वलन व महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली.
▪️ पूजनानंतर हभप.श्री राजेंद्र महाराज शहाणे यांचे नरहरी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
▪️ त्यानंतर जमलेल्या सर्व समाज बांधवांना नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले. ▪️ त्यानंतर सागर मैड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
▪️ कार्यक्रमात ज्येष्ठ दिवंगत धडाडीचे कार्यकर्ते सर्वांचे प्रेरणास्थान नाना नगरकर यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
▪️ त्यानंतर महाराजांची आरती होऊन महाप्रसादाचा सर्वांनीं लाभ घेतला.
