अशोक शेंडकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
—ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून————————-
लोणी मावळा गावचे सुपुत्र अशोक बबन शेंडकर, सध्या देवी एकवीरा विद्यालय, गोवंडी (मुंबई) येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या विद्यालयात त्यांनी २८ वर्षांची सेवा रुजू केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मुंबई यांच्याकडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार-२०२६ मिळाला आहे. आपल्या शाळेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी केलेले नेतृत्वपूर्ण कार्य, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तप्रिय प्रशासन आणि विद्यार्थीकेंद्रित कार्य यांसाठी या संघटनेकडून हा पुरस्कार दिला जातो.
गेल्या १४ फेब्रुवारी शनिवाररोजी डी. एस. हायस्कूल,सायन (मुंबई) येथे त्यांना सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अशोक शेंडकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाना ढवळे, दत्ता उनवणे, सुरेश खोसे, मुकुंद निघोजकर, योगेश खाडे (निघोज), विकास शेंडकर, बाबासाहेब दौंड (लोणी मावळा) या पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केलेआहे. देवी एकवीरा विद्यालय, गोवंडी (मुंबई), श्री छत्रपती विद्यालय आणि ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ, लोणी मावळा यांच्याकडून शेंडकर यांचे कौतुक होत आहे.
