*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड *
मराठी भाषा गौरव दिन म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान- श्रीमती जयश्री घोटेकर
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास यास कडून
(अळकुटी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न)
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. संतांच्या अभंगांतून ती भक्तीचा मार्ग दाखवते, तर शाहिरांच्या पोवाड्यांतून ती वीररस जागवते. ज्ञानेश्वरांनी ‘अमृतानुभवा’तून या भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही रसाळ असल्याचे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी भाषेला राजाश्रय मिळवून दिला, ज्यामुळे ही भाषा आजही ताठ मानेने उभी आहे. मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. म्हणूनच मराठी भाषा गौरव दिन म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे, असे प्रतिपादन श्रीमती जयश्री घोटेकर यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.कवडे म्हणाल्या की, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…” या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी ऐकल्या की प्रत्येक मराठी हृदय अभिमानाने भरून येते. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा वारसा आहे. या भाषेचा गौरव करण्यासाठी आणि कुसुमाग्रजांच्या साहित्यातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो, असे म्हटले.
याप्रसंगी प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. राजाराम गोरडे, सुनिता भालेराव, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वाती फापाळे, सूत्रसंचालन प्रा.पूजा वैरागर तर आभार प्रा.शर्मिष्ठा बोरुडे यांनी केले.
