पाडळी आळे गावात श्री गवळीबाबा मंदीर हे खूप पुरातन काळातील स्वयंभू जागृत देवस्थान आहे. ही देवता परिसरातील सर्व जनतेनचे सतत रक्षण करते.या मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभिकरणासाठी पाडळी आळे गावातील व परिसरातील जनतेने रोख स्वरूपात देणगी व वस्तूरूपाने मदत गोळा करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गावातील सर्व लहान थोर भाविक भक्तांनी व महिलांनी श्री गवळीबाबा महाराजांच्या उत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. श्री गवळीबाबा मंदिराचा कलशारोहन कार्यक्रम राज्य सरकारचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्राप्त हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तसेच गोमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला.सायंकाळी ७ते९ या दरम्यान युवा किर्तनकार हभप तुषार महाराज पाबळे यांचा किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री गवळीबाबा मंदिर जीर्णोद्धासाठी वस्तूरूपाने व रोख स्वरूपात देणगी देणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे समस्त ग्रामस्थ पाडळी आळे यांच्यावतीने मनापासून आभार !
