ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
: कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य बिपिनराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
बिपिनराव गायकवाड यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत प्रामाणिक व निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना सहकाऱ्यांमध्ये विशेष मानाचे स्थान होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
“परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो,” अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.
गायकवाड यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार व पत्रकार बांधव असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

