*श्रीयुत मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय लोकराज्य राज्य पातळीवरील विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात याही वर्षी सदर पुरस्कार 26 मार्च रोजी पुणे येथे ठेवले आहे त्यावेळी हे सर्व पुरस्कार दिले जाणारा असून फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे कार्यक्रम पत्रिका आपणास पाठवली जाणार आहेत परंतु यावर्षी पुरस्कारामध्ये वकिली क्षेत्रात अतिशय डेली प्रमाण असे काम करीत असलेल्या व नव युवा एडवोकेट कोमलताई बोरा यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच पारनेर येथे बालकल्याण मध्ये प्रमुख पदी असलेल्या डॉक्टर सुवर्णाताई लोळगे यांची वैद्यकीय क्षेत्राच्या कामामुळे व कोरोना काळात केलेल्या कामामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच युवा कार्यकर्ते सतत शेतकऱ्यांशी जोडलेले नेहमीच आंदोलनात पुढाकार घेतलेले नुकतेच उपमुख्यमंत्री श्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पक्षात गेलेले व पारनेर तालुक्यातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख माननीय श्री सुजित दादा झावरेपाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेले श्री महेंद्र शेठ पांढरकर यांना विशेष गौरव पुरस्काराने निवड झाल्यामुळे तालुक्यात यांच्या निवडीबद्दल अतिशय आनंद व्यक्त करण्यात येत आहे समाजातील विविध क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींची अतिशय बारीक चौकशी करून त्यांच्या कामाचा पूर्ण अभ्यास करून राष्ट्रीय लोकराज्य हा पुरस्कार देत असते राष्ट्रीय लोकराज्य समितीने हा पुरस्कार जाहीर केल्यामुळे पत्रकारांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे या कामी पत्रकार सातत्याने प्रयत्न करून असून कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणार आहे त्या दृष्टीने तयारी चालू असून ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांनीही माहिती आपल्या पत्रकाद्वारे दिली आहे


