वंदे मातरम् गीतनिर्मितीचा शतकोत्तर सुवर्ण मोहोत्सव – दिनेशदादा बाबर
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
अळकुटी महाविद्यालयात वंदे मातरम् गीतनिर्मितीचा शतकोत्तर सुवर्ण मोहोत्सव साजरा
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात “वंदे मातरम्” हे गीत अत्यंत प्रेरणादायी व राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना जागृत करणारे आहे. या गीताने लाखो भारतीयांना स्वातंत्र्याच्या संघर्षासाठी प्रेरणा दिली. “वंदे मातरम्” या गीताची निर्मिती महान साहित्यिक व राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. या गीतनिर्मितीच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा शतकोत्तर सुवर्ण मोहोत्सव हा भारतीय सांस्कृतिक व राष्ट्रीय परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव आहे, असे प्रतिपादन पारनेर पंचायत समिती सदस्य श्री. दिनेशदादा बाबर यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने वंदे मातरम् गीतनिर्मितीचा शतकोत्तर सुवर्ण मोहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वंदे मातरम् गीताचा ऐतिहासिक दृकश्राव्य लघु चित्रपट रथ पुणे येथून महाविद्यालयात आला असता सर्व विद्यार्थ्यांना हा लघुपट दाखविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुंदा कवडे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.कवडे म्हणाल्या कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अतिशय पथदर्शी कार्य आरंभीले असून अळकुटी महाविद्यालय या सुवर्ण मोहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद होत आहे, असे म्हटले.
याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे दत्तात्रय शिंदे, प्रा. अर्जुन चाटे, प्रा. विशाल रोकडे, गोरख घोलप, सूर्यमाला भोर, प्रा. शर्मिष्ठा बोरुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. दशरथ पानमंद, प्रा. दत्तात्रय शेळके, प्रा. प्रियंका दिवटे, प्रा.सुनिता जाधव, प्रा. विनायक सोनवणे, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. मच्छिन्द्र बेलोटे, प्रा. अमोल नालकर, प्रा. पूजा वैरागर, प्रा. पांडुरंग उघडे, प्रा. स्वाती फापाळे, प्रा. सुषमा करकंडे, प्रा. ऋषिकेश गिते, प्रा. अनुराधा गाढवे, डॉ. शांताबाई थोरात, प्रा. रावसाहेब झावरे, प्रा. संदीप गेटम, प्रा. राजाराम गोरडे, सुनिता भालेराव, नितीन घोलप, छाया म्हस्के, विकास सोनवणे, राहुल बोरुडे, मनोहर कनिंगध्वज, सागर शितोळे, आदी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.विशाल रोकडे तर आभार प्रा. अर्जुन चाटे यांनी केले.
