देवीभोयरे येथे गुढीपाडव्यानिमित्त व्हईक विधी संपन्न
पत्रकार नाना ढवळे यांच्याकडून
परंपरा म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला सांगता येईलच असे नाही. आपण तो शब्द समाजाकडून जसा ऐकला, लिहिला किंवा अनुभवला म्हणून आपण तो वापरतो. त्याला तशी विशिष्ट अशी कारणमाला सांगता येणार नाही. यालाच परंपरा म्हणतात.
हिंदूंचे नवीन वर्ष म्हणून गुढी पाडवा सण आपण नुकताच साजरा केला. या पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात एखाद्या गावाचे वर्षभराचे भविष्य आणि पर्जन्यमान बघण्याची एक परंपरा चालत आलेली आहे. तिलाच आढी बघणे किंवा व्हईक असे म्हणतात.
देवीभोयरे (ता. पारनेर, जि. अ.नगर) येथे गेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी व्हईक पाहण्याचा विधी संपन्न झाला.
त्याप्रमाणे येत्या वर्षात पाऊसपाणी भरपूर होणार आहे. धनधान्य मुबलक होईल, रोगराई आटोक्यात राहील. एकंदरीत येते वर्ष गावासाठी सुखासमाधानाच जाईल असे भाकित वर्तवण्यात आले.
पोळ गुरुजी (पुरोहित), सुरेश काका क्षीरसागर (भटजी), गुरव समाजाचे (येथील अंबिका माता मंदिराचे पुजारी) वसंत, संपत आणि संतोष केदारी यांनी हा विधी यथास्थित पार पाडला.
या वेळी अशोक मुळे, विद्यमान सरपंच, सुभाष बेलोटे, मा. पंचायत समिती सदस्य, विठ्ठल सरडे, मा. सरपंच, जयवंत मुळे, माजी सरपंच, विकास सावंत, माजी उपसरपंच, सुभाष बेलोटे, व्हाईस चेअरमन, नाना ढवळे, साहित्यिक व पत्रकार, गोपीचंद बेलोटे, विश्वनाथ गाजरे गुरुजी, पांडुरंग बेलोटे, दगडू बाबा मगर, सखाराम मुळे, सत्यवान बेलोटे, रामदास गाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
