निघोज तालुका पारनेर येथील माता मळगंगेची यात्रा एक एप्रिल पासून सुरू होत असून वरील प्रमाणे वेळापत्रक ग्रामीण जाहीर केले आहे यामध्ये विविध असे कार्यक्रम असून माता मळगंगेला दिनांक एक एप्रिल रोजी हळद लागते त्यानंतर 2 एप्रिल रोजी देवीची मानाचीकाठी मिरवणूक असते त्यानंतर छबिना मिरवणूक काठी मिरवणूक बगड गाडा मिरवणूकआंबील वर्तन व महाप्रसाद दिनांक 10 एप्रिल रोजी 11 एप्रिल रोजी माता मळगंगेची घागर सकाळीमिरवणूक कार्यक्रम होऊन दुपारीछबिना काठ्यामिरवणुकीसह कुंडावर प्रस्थान तसेच दिनांक 12रोजी कुंडावर यात्रा असून कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो तसेच या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती कार्यक्रम तसेच हजरत शाह कादरी उत्सव दिनांक 13 एप्रिल रोजी आहे तसेच दिनांक 14 रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक सायंकाळी सात वाजता होणार आहे अशा प्रकारे आगळीवेगळी यात्रा सर्व समुदायाला एकत्र घेऊन करण्याची पद्धत आजपर्यंत चालू आहे सर्व समाज बांधव यात्रेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती साठी तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहाने भाग घेऊन साजरी करतात या कार्यक्रम पत्रिकेची माहिती श्री ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री वसंतरावजी कवाद सर उपाध्यक्ष श्री अमृत सेठ रसाळ साहेब तसेच ट्रस्ट सचिव माननीय श्री शांताराम जी कळसकर यांनी कार्यक्रम पत्रिका जाहीर करून सांगितले अशी माहिती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख मुकुंद रामचंद्र निघोजकर यांनी दिली आहे
