🚨 न्यायासाठी ठाम मागणी 🚨
संगमनेर येथील वडगाव पान येथे कुमारी ईश्वरी डहाळे या चिमुकलीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे.
या प्रकरणातील आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी व त्याच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यासाठी उपस्थित असलेले सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य, श्री उमेश शेठ बागडे, राज्यसह संपर्क प्रमुख सराफ सुवर्णकार संरक्षण समिती,महाराष्ट्र राज्य
श्री हितेश शेठ पंडीत बारामती तालुकाध्यक्ष,
श्री अमोल शेठ धर्माधिकारी, संघटक
श्री विशाल शेठ अनुसे, सरचिटणीस
श्री अमोल शेठ उदावंत, खजिनदार
श्री श्रीकृष्ण शेठ पंडीत, सह खजिनदार
श्री अमोल शेठ पंडीत, संपर्कप्रमुख
श्री योगीराजशेठ शहाणे, सह संपर्कप्रमुख
इतर सदस्य श्री रतन शेठ पंडीत, श्री अनिल शेठ त्यारे उपस्थित होते
⚖️ पीडित कुटुंबाला तात्काळ यान्याय मिळावा व दोषीवर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवूया.
✊ न्यायासाठी एकजूट होऊया!
