*प्रसिद्धी प्रमुख श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली माता मळगंगेची निघोज येथील आगळीवेगळी यात्रा या यात्रेला जाण्यासाठी भाविक भक्तांची लगबग चालू असते अनेक वेळा निघोज येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टलातसेच ग्रामस्थांना फोन येतात यात्रा केव्हा आहे त्यांना ओढ असते देवीला हळद केव्हा लागते देवीची काठी केव्हा उभारते देवीची बगडगड मिरवणूककेव्हा असते तसेच माता मळगंगेच्या तो पावन अशा बालवीरघागर केव्हा निघते छबी ना किती वाजता निघतो कुंडावरील यात्रा केव्हा असते असे असंख्य प्रश्न विचारले जातात मानकरी लोकांना तसेच नियमित येणाऱ्या भक्तांना श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट मार्फत पत्र दिले जातात वृत्तपत्रात जाहीर केले जाते परंतु लोकांची उत्सुकता असते त्यामुळे याही वर्षी दिनांक दहा रोजी देवीचा बगडगड मिरवणूक रात्री छबिना तसेच बारवे तू नघागर निघणार असून त्याची मिरवणूक सकाळी सहा सातच्या दरम्यान संपूर्ण बाजारपेठेतून होत असते त्यासाठी लोकांची प्रचंड अशी गर्दी पहावयास मिळते या घागरीवर भाविक भक्तांकडून पुष्पवृष्टी केली जाते त्यानंतर काठी पालखीसह मिरवणूक दुपारी निघून कुंडावर जाते दुसऱ्या दिवशी दिनांक 12एप्रिल रोजी कुंडावरील यात्रा असून तेथेही हंगामा तमाशा यात्रेतील दुकाने व देवीचे दर्शन करण्यासाठी भाविक भक्त कुंडावर जातात अशा यात्रेला आपण आवर्जून यावे मातेचे कृपाशीर्वाद घ्यावे अशी विनंती श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट मुंबईकर मंडळ यात्रा कमिटी तसेच निघोज ग्रामस्थ यांच्याकडून केली आहे